शहरा पाठोपाठ कुद्रेमानी परिसरात देखील बिबट्या चे दर्शन झाल्याने बेळगावचे वन खाते एकदम खडबडून जागे झाले असून दोन्ही कडे शोध मोहीम सुरू केली आहे.कुद्रेमानी परिसरात कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे अधिकारी मोहीम सहभागी झाले आहेत.
शहरातील हिंडालको परिसरात बिबटयाचे दर्शन झाल्यावर बेळगाव चंदगड सीमेवर देखील एक बिबटया दिसल्याने शेतकऱ्यांत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.गेल्या पंधरा दिवसापासून बेळगाव खानापूर चंदगड या परिसरात फिरणारा बिबट्या अखेर बेळगाव चंदगडच्या सीमेवरील कुद्रेमनी तुर्केवाडी च्या हद्दीत दाखल झाला आहे. या बिबट्याना जेरबंद करण्यासाठी वन खात्याने व्यापक मोहीम हाती घेतली आहे
गेल्या पंधरा दिवसापासून बेळगाव खानापूर चंदगड या परिसरात फिरणारा बिबट्या अखेर बेळगाव चंदगडच्या सीमेवरील कुद्रेमनी तुर्केवाडी च्या हद्दीत दाखल झाला आहे.
काही दिवसांपासून बिबट्याचा संचार बेळगाव तालुक्यातील बेकिनकेरे जंगलात तसेच देसुर परिसरात असल्याची चर्चा स्थानिक ग्रामस्थांमध्ये होती. मात्र केवळ पावलांच्या ठशांच्या आधारे सदर प्राणी बिबट्या की तरस याबाबत वनखातेही ठामपणे काही सांगू शकले नव्हते. मात्र शुक्रवारच्या व्हिडिओ चित्रणामध्ये सदर प्राणी बिबट्याच असल्याचे स्पष्ट होते. बिबट्याच्या शोधासाठी बेळगाव विभागाचे डेप्युटी वनाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वाखाली रमेश गिऱ्यापनांवर,एस ए मगदूम मोहम्मद किल्लेदार आदींचे पथक कार्यरत आहे.
कुद्रेमानी शेतवाडीतला बिबटयाचा व्हीडिओ पहाण्यासाठी खालील लिंक क्लिक करा