धारधार मांज्याच्या घटना वाढत असताना एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना शनिवारी दोघांचे मांज्यामुळे गेळे चिरले गेले. तर रविवारी एका घारीला इजा पोहचली आहे. त्यामुळे या घटना थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज वाढली आहे.
बाबले गल्ली अनगोळ येथे ही घटना घडली आहे. तर शनिवारी गांधीनगर आणि हिंडलगा येथे घडलेल्या घटनेत दोन तरुण जखमी झाल्याची घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्त यांनी काढलेला आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम करण्यात येत आहे.
शनिवारी दयानंद केशव आनंदाचे वय 32 हा गांधीनगर जवळ जखमी झाला झाला. तर ही हिंडलग्याजवळ घडलेल्या घटनेत सिद्धार्थ संजय तरळे वय 20 हा युवक जखमी झाला. अशा घटना दररोज घडत असून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
मांज्यावर बंदी आल्यावरच या घटना कमी होणार आहेत. मात्र पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी जर कोणीही मांज्यामुळे जखमी झाल्यास मुलांच्या पालकांवर कारवाई करू, असे सांगीतले होते.मात्र त्यांच्या या आदेशला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचेच दिसून आले आहे. 7 ते 8 घटना घडल्या आहेत मात्र एकावरही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे असे आदेश काढ्यायचेच कशाला? असा प्रश्न निर्माण होत आहे.