खानापूर येथील यात्रेच्या निमित्ताने खानापूर येथीलच जागरूक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते विवेक गिरी यांनी आपले म्हणणे मांडून आता आपण लादलेली यात्रा करूया पण पाणी प्रश्न किती महत्वाचा आहे याकडे लक्ष वेधले आहे.
विवेक गिरी म्हणतात,
“माझ्या या पोस्टची दखल यात्रा कमीटी, नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक तसेच शहरातील जागरुक पत्रकार घेतील अशी अपेक्षा. लादलेल्या जत्रेची कोणतीच पुर्वतयारी नसताना लादली. आता आम्ही ही जत्रा वादविरहीत पार पाडावी यासाठी सहकार्य करणार आहोत यात शंकाच नाही. मात्र जत्रेत पाण्याचा गंभीर प्रश्न निश्चितच असणार. आता नदीवर नव्याने बांधलेल्या बंधाऱ्यात पाणी अडविण्यात आले आहे. तेही अर्धवट तसेच शहरातील गटारीतील मलमीश्रीत पाणी नव्या बंधार्याच्या तीथेच सोडण्यात आले आहे. तसेच जळगा बंधाऱ्यात पाणी अडविल्याने शहरातील मलमीश्रीत पाणी एकत्रच मिसळले आहे. हेच पाणी सध्या शहराला पुरवठा करण्यात येत आहे.
नगरपालिकेच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पाची पाणी शुद्धीकरणाची क्षमता सर्वज्ञात आहे. तसेच हेच पाणी शहरातील हॉटेलांमध्ये ग्राहकांना देण्यात येते. तसेच जत्रेपर्यंत याच पाण्याची अवस्था काय होणार हे यात्रा कमीटीच जाणे…………….. आमचा जत्रेला विरोध नव्हता आणि आजही नाही मात्र जत्रा भरविण्याच्या अगोदर शहरातील नियोजन करुन ४ वर्षांनी जत्रा भरविण्यात यावी अशी मागणी आम्ही केली होती. मात्र हट्टाला पेटलेल्या जुन्या कमीटीने जत्रा लादली.
असो पण आता पाण्याचा गंभीर प्रश्न राहणार आहे. हेच पाणी आणखी तीन महिन्यांत कीती गढूळ तसेच मलमिश्रित असेल हे माहीत नाही. दूषित पाणी यात मिसळत असल्याने अनेक आजाराला निमंत्रणच आहे. जत्रा कमीटीने याची गंभीर दखल घेऊन उपाययोजना करावी ही विनंती .आम्ही आता आपल्या बरोबरच आहोत.”
यात्रेच्या निमित्ताने एक ज्वलंत प्रश्नावर विवेक गिरी यांनी हात घातला असून याकडे संबंधीत लक्ष देतील ही अपेक्षा बेळगाव live करत आहे.