जिल्हा प्रशासनाने वाळू बंदी करून अनेकांच्या पोटापाण्यासाठी धडपड करणाऱ्याची बोळवण केली आहे. याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग करण्याचा घाट घालण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्याच्या जमिनी जाणार आहेत त्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी 12 नोव्हेंबर रोजी खानापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. सध्या खानापूर येथील महालक्षमी यात्रोसव होणार आहे. त्यामुळे घरांची कामे आणि इतर कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र वाळू बंद करण्यात आल्यामुळे याचा फटका नागरिकांना बसत आहे.
गोवा आणि बेळगाव हा राष्ट्रीय महामार्ग करण्यात येत आहे. मात्र या मार्गात अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी जाणार आहेत. याचा मोबदला सरकरने द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात येणार आहे. जर या मागण्या मान्य केल्या नाहीत तर हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले
वाळू संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे मागण्या मान्य न झाल्यास होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार राहील, असा इशाराही खानापूर तालुका समिती अध्यक्ष दिगंबर पाटील समितीच्या वतीने देण्यात आला आहे.