राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालिका निलमनी राजू यांनी राज्यात अत्यंत शिस्तीने संयमाने दक्षतेने पुढे घेऊन जात आहेत त्यामुळेच देशातील इतर पोलीस खात्याला त्या आदर्श ठरल्या आहेत असे गौरव उदगार गृहमंत्री जी परमेश्वर यांनी काढले.
शनिवारी के एस आर पी प्रशिक्षणार्थी पोलिसांच्या शपथविधी पथसंचनल कार्यक्रमात सहभागी झाल्यावर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.देशात कर्नाटक पोलिसच सर्वोत्तम असा शेरा देत त्यांनी पोलीस खात्याची प्रशंसा केली. यावेळी पोलीस महासंचालक निलमनी राजू,ए डी जी पी भास्कर राव,आमदार अंजलीताई निंबाळकर आदी उपस्थित होते.
देशातील सर्वात पहिले सायबर पोलीस स्थानक बंगळुरू सी आय डी कार्यालयात 22 कोटी खर्चून सायबर तंत्रज्ञान घटक तयार केला आहे इन्फोसिस कंपनी च्या मदतीनं सायबर गुन्हे नियंत्रण प्रशिक्षण कॉलेजच्या स्थापनेचे काम सुरू आहे.मानवी हक्कांच रक्षण करणे हे पोलिसांचे कार्य आहे घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत.जाती धर्मातील भांडणानी कायदा सुव्यवस्था अडचणीत येऊ लागलीय असे ते म्हणाले.
पुढील पाच वर्षात 20 हजार रिक्त पदे पोलीस खात्यात भरली जातील असे सांगत त्यांनी 362 पोलीस कॉन्स्टेबल आणि 40 महिला पोलिसांना शपथ दिली यावेळी प्रशिक्षणार्थी पोलिसांनी शानदार पथ संचलन केलं.