हुबळी विमानतळावर जास्तीत जास्त विमानसेवा पुरवण्याचा धडाका तिथले खासदार प्रल्हाद जोशी यांनी सुरू केलाय. आता देशाबरोबरच विदेशातल्या महत्वपूर्ण देशांमध्ये विमानसेवा मिळणार आहेत.
कुवेत, मस्कत, अबू धाबी, दुबई, दोहा, हॉंगकॉंग आणि सिंगापूरला पण विमानसेवा मिळणार आहेत.
कोलोम्बो साठी सुद्धा हुबळी मध्ये विमान मिळणार असून खासदार प्रल्हाद जोशी यांचे यामध्ये योगदान आहे.
बेळगावचे खासदार आता उडान मध्ये नाव घालून स्वस्त बसले आहेत. बेळगावच्या विमानतळावर विमाने उपलब्ध करण्यास ते काय करणार की शांत राहणार हा प्रश्न निर्माण झाला असून त्याची चर्चा आहे.