पोलीस कॉन्स्टेबल व नातेवाईक बसले माशा मारत
बेळगावमध्ये आज प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कॉन्स्टेबल चा शपथ विधी कार्यक्रम होता. पण या कार्यक्रमाला गृहमंत्री जी परमेश्वर तीन तास उशिरा पोचले. बेळगावला पोचल्यावर काँग्रेस चे खासदारकीची उमेदवारी कुणाला द्यायची याची चर्चा ते करत बसले त्यामुळे शपथ विधी कार्यक्रमाला आलेल्या कॉन्स्टेबलच्या नातेवाईकांना माशा मारत बसावे लागले.
गृहमंत्री सकाळी ८ वाजता येणार होते. पण ते आले नाहीत. ११ नंतर ते कार्यक्रम स्थळी पोचले. कारण त्यांनी माजी खासदार एस बी सिदनाळ यांची भेट घेतली लोकसभा निवडणुकीचे काँग्रेसचे तिकीट लिंगायत व्यक्तीला द्यायचे की बाकी कुणाला याची चर्चा केली.
सिदनाळ यांच्या पुत्राला यावेळी खासदारकीची उमेदवारी पाहिजे आहे त्यांनी गृह मंत्र्यांना गळ घातली त्यामुळे मुख्य कार्यक्रम बाजूला राहिला अशी चर्चा आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रात मात्र पोलीस खात्याने प्रशिक्षणार्थी नातेवाईकांना बोलवले होते तासंतास कार्यक्रम सुरू न झाल्याने काही नाराज नातेवाईकांनी जाणे पसंत केले यावेळी उन्हात बसलेले नातेवाईक पिण्याच्या पाणी देखील न मिळाल्याने नाराज होते.राजकारणी लोकांना कार्यक्रमाला बोलावले की सामान्य नागरिकांना तासंतास वाट बघावी लागते याचे हे उदाहरण आहे.