बेळगावचे प्रतिष्टित नागरिक, कऱ्हाडे ब्राहण संघाचे संस्थापक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव गुर्जर (बोन्द्रे) वय १०३ वर्षे रा. बेळगाव यांचे शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता वृद्धपकाळाने निधन झाले.
महात्मा गांधीजींच्या १९४२ च्या चले जाव चळवळीत सहभाग घेतल्याने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते २०१५ मध्ये राष्ट्रपती भवनात त्यांचा स्वातंत्र्य सैनिक म्हणून सत्कार करण्यात आला होता.
बेळगावातील अनेक सामाजिक संघांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. ज्येष्ठ नागरिक संघाची बेळगाव येथे त्यांनी स्थापना केली होती.
रामदेव गल्ली येथे १९४४ ते १९७२ पर्यंत कापड व्यवसाय करत असताना त्यांनी व्यापारी आणि कर्मचारी संघटना स्थापन केली होती. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य देण्यासाठी त्यांनी बोन्द्रे गुर्जर विश्वस्त निधीची स्थापना केली.
शनिवारी सकाळी ८ वाजता डबल रोड हनुमान नगर येथून अंत्ययात्रा निघणार असून सदाशिवनगर येथे अंत्यविधी होणार आहेत.