Monday, December 23, 2024

/

‘बुडालेले ते शाळकरी मित्रचं’

 belgaum

पोहायला गेलेले चार शाळकरी युवक सावगाव तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. साहिल बेनके वय बेनकनहळळी, अमन सिंह वय रा.गणेशपूर, चैतन्य भांदुर्गे वय रा. भाग्यनगर अनगोळ तर गौतम कलघटगी वय रा.शहापूर अशी बुडून मयत झालेल्या मुलांची ओळख पटली आहे.

पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी अकराच्या सुमारास चौघेही युवक आपल्या दुचाकीसह या धरणाकडे गेले होते पोहण्यासाठी ते तलावात उतरले त्यात चौघांचाही मृत्यू झाला आहे.

Savgaon dam

अशी कळली घटना

बुधवारी दुपारी ग्राम पंचायत सदस्य बसवंत घाटेगस्ती हे धरणाच्या जवळून जात होते त्यावेळी धरणाच्या काठावर दोन दुचाक्या आणि कपडे तेवढेच त्यांनी पाहिले त्यावेळी त्यांना इथे काही तरी घटना घडली असावी असा संशय आला त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली त्यानंतर लागलीच ग्रामीण पोलिसांना याची कल्पना देण्यात आली.

ग्रामीण पोलीस निरीक्षक संगमेश हे सावगाव धारणा जवळ चारच्या सुमारास दाखल झाले पाणबुड्या सह त्यांनी शोध मोहीम सुरू केली आणि केवळ दोन तासातच सर्व बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढले.घटनास्थळी दोन गाड्या चौघांचे कपडे बूट आणि मोबाईल फोन देखील गाडीत ठेवले होते त्यामुळे सुरुवातीला पोलिसांनी चार जण बुडल्याचा संशय व्यक्त केला होता तो खरा ठरला. घटनास्थळी या भागातील लोकांनी मयतांच्या नातेवाईक इतरांनी गर्दी केली होती.बेनकनहळळी येथील मयत साहिल बेनके याचे नातेवाईक घटनास्थळी हंबरडा फोडत होते अगदी हृदय द्रावक दृश्य घटनास्थळी होते.

चौघे युवक मित्र होते  गुडस शेफर्ड शाळेचे विद्यार्थी होते ते फिरायला पार्टी करायला म्हणून ते धरणाकडे गेले होते अशी देखील माहिती मिळाली आहे.या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत मयत मुलांचे मृतदेह शवविच्छेदन साठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांच्या नातेवाईकांना देण्यात येणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.