बिबट्याच्या प्रश्नावर विचारले असता तुम्ही कन्नड बोला, तुम्हाला लोकप्रतिनिधी कुणी केले असे बोलून अपमान करणारा वन खात्याचा आर एफ ओ श्रीकांत कडोलकर याला सभागृहात बोलवून जि प सदस्या सरस्वती पाटील यांची माफी मागायला लावावी असे आदेश जि प अध्यक्षा आशा ऐहोळे यांनी दिले आहेत.
आज जि प ची बैठक सुरू आहे. या बैठकीत सरस्वती पाटील कडाडल्या. जि प अध्यक्षा सुद्धा महिला आहेत. काम करायचे सोडून अपमान करण्याचा अधिकार वन खात्याच्या त्या कडोलकर या अधिकाऱ्याने केला आहे त्याची नुसती चौकशी नको तर त्याला लोकप्रतिनिधी महिलेची माफी मागायला लावा अशी मागणी सुद्धा सदस्य मोहन मोरे यांनी केली.
कडोलकर प्रकरणाची चौकशी करा आणि अहवाल द्या अश्या सूचना बैठकीला उपस्थित वरीष्ठ वन अधिकाऱ्यांला केल्या नंतर सरस्वती पाटील मोहन मोरे इतर दोघे कन्नड सदस्यांनी हा विषय लावून धरल्याने अधिकाऱ्याला बैठकीत बोलवून चौकशी करा असे आदेश अध्यक्षानी दिलेत.या विषयावर बैठकीत वादळी चर्चा होऊन शेवटी त्या अधिकाऱ्याला बोलवून घेण्याचे ठरवण्यात आले आहे.
ए पी एम रस्ता का होत नाही?
ए पी एम सी हंदिगनूर रस्ता दुरुस्त करा अशी मागणी करताना सरस्वती पाटील यांनी सभागृहाचे उपाध्यक्ष अरुण कटांबळे दररोज दोन तीन वेळा या रस्त्यावरून ये जा करत असतात तरी देखील तीन वर्षे शासकीय खाती लोक प्रतिनिधी असून देखील या रस्त्याकडे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित केला. या कामासाठी अधिकारी पैसे नाहीत म्हणतात याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली.
जिल्हा पंचायतीच्या बैठकीला सावंगाव येथील तलावात बुडून मयत झालेल्या बालकांना श्रद्धांजली वाहण्यात आली सदस्य मोहन मोरे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला.जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष डॉ रामचंद्रन आणि अध्यक्षा आशा एहोळे उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्या उपस्थितीत ही सर्वसाधारण बैठक आयोजित केलीय.