बिबट्या, तरस आणि रान मांजर यापैकी कोणीतरी एक पाहुणा कुत्री आणि शेळ्या मेंढ्या फाडून खात आहे. गवे रेडे आणि हत्ती नागरी वस्तीत येत आहेत. त्यांचे अपघात आणि इतर घटनांनी वृत्तपत्रांचे रकाने भरत आहेत. यातच लोकप्रतिनिधी व वन अधिकारी यांची बोली भाषेच्या मुद्द्यांवरून पेटलेली भांडणे गाजत आहेत. मुद्दा हा की जंगली जनावरे मानवी वस्तीत येत असून माणूस धोक्यात आला आहे. *जंगली जनावरांचा लोकवस्तीत प्रवेश* वनखाते आणि माणसे शहाणी कधी होणार?हा प्रश्न विचारात घेण्यासारखा आहे.
बेळगाव शहर आणि तालुका, खानापूर तालुका आणि जवळच्या चंदगड तालुक्यावर नेहमीच ही टांगती तलवार आहे. पण सध्या सतत घडत असलेल्या घटनांमुळे हा धोका जास्तच वाढत आहे. वाढती जंगल तोड आणि माणसाचे जंगलात आक्रमण याचा फटका जंगली जनावरांवर होत असून ही जनावरे थेट मानवी वस्तीत प्रवेश करत आहेत. आता पर्यंत कुत्री आणि शेळ्यांवर निभावले आहे पण यापुढे शेतात काम करणारी, गावच्या अंतर्गत रस्त्यांवरून प्रवास करणारी माणसे कधीही या जनावरांच्या हल्याची शिकार होऊ शकतात पण शोध या नावाखाली दुसरे काही होत नाही ही वस्तुस्थिती दिसत आहे.
राजकारणी आणि त्यांचे हस्तकच लाकूड माफिया झाल्यामुळे आता जंगले उध्वस्त झाली आहेत. जंगलाचा आपल्या श्रीमंती साठी कसा उपयोग करून घ्यायचा हे पाहिले जाते त्यामुळे जनावरांना पाहिजे असलेले वातावरण शिल्लक नाही. त्यांना पाणी नाही. जंगली जनावरे जंगलातच राहावीत ती वाट चुकून मानवी वस्तीत येऊ नव्हेत म्हणून वन विभाग जे काही करायला पाहिजे ते करत नाही.
मागे एकदा चिखले भागात एक वाघाने एक महिलेचा जीव घेतला. त्याला अभ्यास करण्यासाठी एक गृह मंत्र्यांच्या मुलाने आणून सोडले होते. तसा तर काय प्रकार नाही ना? हे सुद्धा बघावे लागेल. आता जरा माणूस आणि वनखाते शहाणे होऊन काम करेल ही अपेक्षा.