आपले पैसे आज मिळतील उद्या मिळतील या आशेने बसलेल्या ठेवीदारांनी आज संगोळी रायन्ना सोसायटीचा चेअरमन आनंद अप्पूगोळ च्या विरोधात जोरदार निदर्शने केली. जिल्हा प्रशासनाने शब्द दिल्याप्रमाणे आमचे पैसे परत मिळवून द्या अशी मागणी केली आहे.
आज दिवाळी सणात अनेक ठेवीदार रस्त्यावर उतरले आहेत.
आम्ही पैसे भरून श्रीमंत होण्याचे स्वप्न बघितले पण २३० कोटींचा गैरव्यवहार करणाऱ्या अप्पूगोळ याने आपल्याला रस्त्यावर आणले आहे.जिल्हा प्रशासन फक्त आश्वासने देऊन पैसे परत मिळवून देऊ असे सांगत आहे , पण फक्त दिवस जात असून आम्हाला आमचे पैसे लवकर परत मिळवून द्या अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात लवकर मार्ग काढुन आम्हाला आमच्या ठेवी व्याजासहीत परत द्याव्या असे निवेदन दिले आहे.