थकीत ऊस बिल देण्याच्या मागणीसाठी ऊसाच्या ट्रक हलगा येथील सुवर्ण सौध मध्ये घुसवून आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि पोलिसात संघर्ष झाला यातएक शेतकरी किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान पोलिसांनी दहा शेतकऱ्यांवर गुन्हा नोंदवून त्याची रवानगी कारागृहात केली आहे.
मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामीं यांनी दिलेलं आश्वासन न पाळल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी ऊसाचे पाच ट्रक
हलगा येथील सुवर्ण सौध मध्ये घुसवून आंदोलन केले यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.मागील वर्षीचे ऊसाचे थकीत बिलाच्या मागणीसाठी गेले चार दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.
शुक्रवारी मुख्यमंत्री कुमारस्वामीं यांनी शेतकऱ्यां बरोबर दूरध्वनी वरून चर्चा करून सोमवारी बेळगावला येऊन शेतकरी नेत्या बरोबर समक्ष चर्चा करून ऊस बिलाची समस्या सोडवू असे आश्वासन दिले होते मात्र रविवारी मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य करत मंगळवारी बेळगावच्या शेतकऱ्यांना बंगळुरूला चर्चेसाठी बोलावले त्यामुळं दिलेला शब्द न पाळल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी रविवारी हे आंदोलन केले.
रविवारी सकाळी आंदोलक शेतकरी एकत्र जमले त्यांनी सुवर्ण सौध गाठून ऊसाच्या पाच ट्रक गेटच्या आत नेल्या ऊस खाली टाकून आणि आंदोलनास सुरुवात केली त्यावेळी पोलीस आयुक्त डी सी राजप्पा, उपायुक्त सीमा लाटकर आदी घटनास्थळी दाखल झाले ट्रक बाजूला करून आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं त्यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांत तणाव निर्माण झाला.आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतेवेळी अशोक यमकनमर्डी नावाचा शेतकरी जखमी झालाय. पोलिसांनी तीस हुन अधिक आंदोलक शेतकऱ्यांना हिरेबागेवाडी पोलीसात स्थानबद्ध केलं होतं.सायंकाळी पोलिसांनी दहा शेतकऱ्यांवर गुन्हा नोंदवून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे.सोमवार पासून पुन्हा शेतकरी आंदोलन चिघळणार आहे.