प्रलंबित उसबिले आणि एफ आर पी प्रमाणे नवीन दर या मागणीसाठी निवेदने, बैठकी आणि चर्चा फोल ठरल्यानंतर आता उत्तर कर्नाटकातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. गुरुवारी शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारून पुणे बंगळूर महामार्ग रोखला असून शेतकऱ्यांना अडवणे प्रशासनाला कठीण जात आहे.
बुधवारी शेतकरी नेते आणि अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी एस बी बोमनहळी यांनी घेतली. पण ही बैठक निष्फळ ठरली असल्याने आता शेतकरी आंदोलन करत आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पुकारून शेतकऱ्यांनी आपला आवाज उठवला असून महामार्गावर रास्तारोकोही करण्यात आला आहे.यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील यांनाही घेराव घातला होता महांतेश नगर जवळ रास्ता रोको केल्याने बराच काळ वातावरण तनावपूर्ण होते तर गाड्यांच्या रांका लागल्या होत्या.शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून हायवे वरून आंदोलक शेतकऱ्यांना बाजूला केले