आज एक खासगी कार्यक्रमासाठी आलेले कर्नाटकाचे पाटबंधारे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डी के शिवकुमार यांनी बेळगावला आंदोलक ऊस उत्पादकांची भेट घेतली. त्यांच्या दिलासादायक आश्वासनानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चालवलेले एक आठवड्यापासूनचे उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
डी के शिवकुमार यांनी बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. सरकारने साखर कारखानदारांना १५ दिवसात मागील बिले देण्याची सूचना केली आहे. साखर कारखानदारांनी ही सूचना मानली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणीही फसवू शकत नाही.
सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी आंदोलन माघार घेऊन जर पंधरा दिवसात मागणी मान्य झाली नाही तर हिवाळी अधिवेशन काळात पुन्हा सुवर्ण सौध समोर आंदोलन केले जाईल असा इशारा मात्र शेतकऱ्यांनी दिला.