Wednesday, January 15, 2025

/

वन अधिकाऱ्यां विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार-समनव्यक मंत्री घेतील बेळगावात बैठक

 belgaum

जिल्हा पंचायत सदस्यांना मराठी बोलण्यास मज्जाव करून महिला लोक प्रतिनिधींना त्रास देणाऱ्या वन अधिकाऱ्यां विरोधात तक्रार करून सीमा समनव्यक मंत्री चंद्रकांत दादा पाटलांनी बेळगावात बैठक घ्यावी अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई मुक्कामी भेट घेऊन त्यांनी निवेदन दिले आहे.गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या लाक्षणिक उपोषणा नंतर शुक्रवारी समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसह विविध नेते मंडळींची भेट घेतली.शिवसेनेच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे,वनमंत्री रामदास कदम,परिवाहन मंत्री दिवाकर रावते,गृहराज्य मंत्री दिपक केसरकर या सेनेचे मंत्री देखील यावेळी उपस्थित होते.

Cm meets saraswati patil

कर्नाटक सरकारच्या अधिकारी वर्गाकडून सीमा भागातील मराठी लोक प्रतिनिधींना जाणून बुजून होणाऱ्या नाहक त्रासा बाबत सरस्वती पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.सीमा भागात बेळगावं प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित असतेवेळी देखील बेळगाव होत असलेल्या भाषिक अल्पसंख्याकांच रक्षण करावे या बाबत आपण कृतिशील ठोस पावले उचलावी अशीही मागणी केली.आगामी 10 डिसेंम्बर रोजी होणाऱ्या मेळाव्यास सर्व पक्षीय नेते पाठवावे अशी देखील मागणी केली.

शिष्टमंडळाने समनव्ययक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बेळगावतल्या मराठी जनतेच्या भावना समजून घ्याव्या अशी मागणी केली असता लवकरच समनव्यक मंत्री बेळगावात बैठक घेतली भाषिक अल्पसंख्याकाचे कसे रक्षण करता येईल यावर केंद्राला याची माहिती देऊ आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल.यावेळी माजी महापौर सरिता पाटील,समिती नेते आर आय पाटील,ग्राम पंचायत यल्लप्पा पाटील,चेतक कांबळे,निंगोजी पाटील,बाबू पावशे,धनंजय पाटील,वासू सामजी,श्रीधर खनुकरआदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.