महापालिका आणि निवडणूक आयोगाने महापालिका आणि लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे, पण मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी फक्त कन्नड आणि इंग्लिश मध्ये च फॉर्म्स उपलब्ध करून, मराठी भाषेत फॉर्म्स उपलब्ध न करता भाषिक वाद निर्माण करण्याच्या प्रयत्न बेळगाव चे निवडणूक आयोग करीत आहे.
मराठी भाषिकांना मराठी भाषेत फॉर्म्स नसल्याने दरवेळी गोची होते त्यामुळे कन्नड फॉर्म्स मध्ये चुकीची माहिती भरली जाते, आणि इलेक्शन कार्ड मध्ये चुकीची नावे येतात आणि त्यामुळे ते कार्ड इतर ठिकाणी वापरताना खूप अवघड होते
या वर्षीही मराठी भाषेत फॉर्म्स उपलब्ध न झाल्याने मराठी भाषिकांची गोची झाली आहे, म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती ने भारतीय निवडणूक आयोगाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे…
तक्रार
बेळगावात ७०% हुन अधिक मराठी भाषिक लोक राहतात, त्याचे शिक्षण मराठी मध्ये झाल्याने अन्य भाषेचा म्हणजे कन्नड भाषेचा गंध नाही, त्यामुळे कन्नड / इंग्लिश फॉर्म भरताना अनेक अडचणी उदभवत आहे.. अल्पसंख्यांकांना भारतीय घटनेने दिलेल्या अधिकाराची बेळगावात स्थानिक निवडणूक प्रशासनाकडून पायमल्ली होत आहे, आणि निवडणूक संबंधित सर्व कागदपत्रे कन्नड आणि इंग्लिश मध्ये देऊन मराठी लोकांची गोची करत आहे असा आरोप महाराष्ट्र एकीकरण युवा समिती ने तक्रारीत केला आहे.. तरी सर्व निवडणूक संबंधित कागदपत्रे, मतदार यादीत नाव नोंदणी आणि दुरुस्ती फॉर्म्स, मतदार याद्या, निवडणूक लढिवण्याचे अर्ज मराठीत उपल्बध करून देण्यास बेळगाव निवडणूक आणि महापालिकेस आदेश द्यावे अशी मागणी तक्रारीत केला आहे…