सीमावासीय पडले उडघड्यावर म्हणून युवा समिती 29 नोव्हेंबर ला आझाद मैदानावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार , असा निर्णय आज युवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
मागील वर्षापासून उच्चाधिकार समितीची बैठक झाली नाही ती तातडीने घ्यावी,सीमा खटल्याला गती मिळावी, तसेच सीमासमन्वयक मंत्र्यांनी सुद्धा बेळगावकडे लक्ष द्यावं अश्या मागण्या साठी युवा समितीच्या वतीने चलो मुंबई दौरा आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षां पासून प्रश्न कोर्टात असून देखील कर्नाटक सरकारची भाषिक सक्ती आणि दडपशाही वाढली आहे म्हणून त्यात महाराष्ट्र शासनाने लक्ष देऊन सिमावासीयांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि युवकांना रोजगारात ज्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत त्या सीमाभागातील मराठी भाषिकांना सुद्धा मिळाव्यात म्हणून बेळगावात कायमस्वरूपी कार्यालय स्थापन करण्यात यावे या मागण्यांसाठी देखील एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा पंचायत सदस्या सौ.सरस्वती पाटील यांना वन अधिकाऱ्याने केलेल्या भाषिक अरेराविचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच शिवरायांच्या जयघोषाबद्दल झालेल्या विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा आणि बोर्डवर भाषिक सक्तीचा ही निषेध करण्यात आला.
सदर बैठकीत विनायक पाटील, अमित देसाई, नितीन आनंदाचे, सचिन केळवेकर, महांतेश अलगोंडी,किरण हुद्दार,विनायक कावळे,अभिजित मजुकर, अंकुश केसरकर, महेश जाधव, अनंत निलजकर, सुरज मजुकर,युवराज मलकाचे, महादेव पाटील, शिवाजी मेनसे, रोहन लंगरकांडे, धनंजय पाटील, चंद्रकांत पाटील,सुनील अष्टेकर, ज्ञानेश्वर मंनूरकर आदी उपस्थित होते, सचिव श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले अध्यक्ष शुभम शेळके यांनी आभार मानले.