बेळगाव स्पोर्टस क्लबचा उदयोन्मुख क्रिकेट खेळाडू सुजय सातेरी याची 23 वर्षा खालील कर्नाटक संघात निवड झाली आहे. या वर्षी होणाऱ्या कर्नल सी के नायडू ट्रॉफीसाठी पंधरा जणांच्या संघात त्याची निवड झाली आहे.
14 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर कर्नाटकयेथील आलूर येथे होणाऱ्या सी के नायडू ट्रॉफीसाठी संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पहिल्या सामन्यात निवड झाली आहे. सुजय याने या अगोदर कूच बिहार ट्रॉफीत सहभाग घेतला होता.सध्या तो बंगळुरू मध्ये असून स्वस्तिक युनियन क्रिकेट क्लब कडून सराव करत असतो.
आता पर्यंत एकूण पाच वेळा त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे.16 वर्षा खालील कर्नाटक संघात एकदा 19 वर्षा खालील संघात तीनदा आता 23 वर्षा खालील संघात निवड झाली आहे.त्याच वय सध्या 20 वर्षे असून 16 आणि 19 वर्षा खालील दक्षिण भारतीय संघात देखील खेळला आहे.
बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार,दीपक पवार प्रशिक्षक संगम पाटील,विवेक पाटील आणि बाळकृष्ण पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.