दिवाळी म्हटलं की किल्ले आले आणि मुलांची चंगळ दिवाळी संपली तरी मुलांसाठी संस्था संघटनांना किल्ला स्पर्धा आयोजित करतात यात सहभाग घेत असतात अश्याच एका युवकाने चांदीत सिंधुदुर्ग किल्ला बनवला आहे.
युवराज मारुती राजापूरकर वडगांव याने आगळा वेगळा किल्ला बनवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहेत त्यांन चांदीचा वापर करून सिंधुदुर्ग किल्ला बनवला आहे स्वतः पेशाने स्वर्णकार असलेल्या युवराज ने 300 ग्रॅम चांदी चा वापर करून हा किल्ला बनवला आहे त्याने स्वखर्चाने किल्ल्याची प्रतिकृती बनवली आहे. अंदाजे 10 ते 15 इंच ही प्रतिकृती असून ती करण्यासाठी त्याला वीस ते पंचवीस दिवसांचा कालावधी लागला आहे.
हा किल्ला बनवण्यासाठी त्याला 15 ते 20 हजार रुपये खर्च झाला आहे. गेली कित्येक वर्षे सुवर्णकार म्हणून काम करतो मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण चांदीच्या किल्ल्याची प्रतिकृती बनवू अशी इच्छा बोलून दाखवली मात्र चांदीचा किल्ला करणे अशक्य असल्याने त्याला पालकांनी सांगितले मात्र त्यानें पालकांचे बोल आव्हान म्हणून स्वीकारत आपले कार्य पणाला लावून सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती निर्माण केली.
या कामी त्याला त्याचे मालक सागर काकतीकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे यापूर्वी अनेकदा 30 मिलि ग्रॅम सोन्याचा वापर करून वर्ल्डकपची प्रतिकृती बनवली होती आता चांदीचा किल्ला बनवून त्यांनी आपल्यातील कलागुणांना कलाकृती निर्माण करीत असतो किल्ल्याची प्रतिकृती ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.