बेळगाव स्पोर्ट्स क्लबचा बेळगावचा सुपुत्र खेळाडू रोनीत मोरे यांच्या गोलंदाजीच्या जोरावर कर्नाटक संघाने मुंबई संघावर पहिल्या डावात दोनशेहुन अधिक धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे.
ऑटोनगर येथील केएससीए मैदानावर सूरू असलेल्या मुंबई विरुद्ध कर्नाटक अ संघांचा चार दिवसीय क्रिकेट सामना सुरू आहे.तिसऱ्या दिवस गाजवला तो रोनित मोरे याने…रोनीतने २१.५ षटकात ५२ धावा देत ६ षटक निर्धाव टाकत ५ विकेट्स घेतल्या अन मुंबईचा अर्धा संघ 205 धावात गारद गेला.
कर्नाटक संघाने प्रथम फलंदाजी करताना ४०० धावा केल्या आहेत. सामन्याचा उद्याचा शेवटचा दिवस असून आज दिवसा अखेरीस दुसऱ्या डावाटत कर्नाटक संघ ३ विकेट्स गमावत ७४ धावावर खेळत आहे.
रणजी अ संघाच्या गुण तक्त्यात मुंबई आणि कर्नाटक हे दोन्ही संघ आठव्या आणि नवव्या क्रमांकावर असूनदोन्ही संघांना विजयाची गरज आहे.