काही दिवसांपूर्वी अपघातात जखमी झालेल्या गवा रेड्यावर गुरुवारी उपचार करण्यात आले.काकती वन परिसरात भूतरामहट्टी जवळ वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी उपचार केले.
जखमी गवा रेड्यावर उपचार करण्यासाठी खास वन खात्याचे पथक मैसूर हुन आले होते त्यांनी देखील जखमी गव्याची पहाणी केली त्या नंतर क्रेन च्या साहाय्याने गव्याला उचलून अधिक उपचारा साठी मैसूर ला हलवण्यात आले आहे.
गव्याला उपचार करतेवेळी भूतरामहट्टी जवळ हायवे ट्रॅफिक जाम झाला होता तर बघ्यांची देखील मोठी गर्दी झाली होती.