बेळगाव शहरा लगतच्या उपनगर आणि ग्राम पंचायतींची सीमा निश्चित करा अशी मागणी मागणी बी के कंग्राळी ग्रामस्थांनी महा पालिकेकडे केली आहे.
गुरुवारी सकाळी बी के कंग्राळी ग्राम पंचायतीच्या शिष्टमंडळाने महापौर बसप्पा चिखलदिनी यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन सादर केलं आहे.
बी के कंग्राळी ग्राम पंचायत व्याप्तीत ज्योती नगर,सह्याद्रीनगर आणि राम नगर ही उपनगर येतात या भागातील काही भाग महापालिकेकडे कर भरतात तर काही भाग ग्राम पंचायत कडे येतो अश्यात काही ठिकाणी कर पालिका घेते सदस्य पंचायतीत आहेत मात्र कर भरत नाहीत त्यामुळे ग्राम पंचायत कराचं उत्पन्न नुकसान होत आहे योग्य विकास होताना दिसत नाही यासाठी दोन्ही सीमा निश्चित करा ज्यामुळं पालिका आणि ग्राम पंचायत दोघांचा फायदा होईल असे पालिकेचे म्हणणे आहे.
महापौर चिखलदिनी यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष, जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील आर आय पाटील,चेतक कांबळे आदी उपस्थित होते.