रयत गल्ली माधवपूर वडगावमधे बहूसंख्य शेतकरी असल्याने गाई,म्हशी ,बैल पाळणे हे आलेच.आधी प्रत्येकाच्या घरी जनावरे होती एका गल्लीत तेवीस बैलगाड्या होत्या एका गल्लीची दोनशे एकर शेती असल्याने जनावरं पाळण अनिवार्य होते कालांतराने विभक्त पध्दत आल्याने जनावरं कमी झाली तरी या गल्लीत अजूनही आठ ते दहा बैलगाड्या आहेतच. वडगाव,शहापूर,बेळगावमधे कोणत्याही गल्लीत येवढ्या बैलगाड्या नाहीत तेवढ्या रयत गल्लीत आहेत म्हणून या गल्लीला शेतकरी गल्ली असे देखील म्हटलं जातंय.
जनावरं पाळण कमीपणाच आहे अशी समजूत अलीकडे वाढायला लागली आहे त्यामुळे देखील जनावरे पाळायच्या संख्येत घट आली आहे पण ज्यांच मुळ शेतकऱ्यांच आहे ते जनावरं पाळतातच.याच उत्तम उदाहरण रयत गल्ली वडगाव मधील शेतकरी समाज आहे या गल्लीतील लोकांचा मुख्य व्यवसाय शेतीच त्यामुळं शेती शी संबंधित असलेल्या म्हशी पाळण्यात देखील ही गल्ली आघाडीवर आहे.
आज बलिप्रतिपदा पाडवा असल्याने शेतकरी,गवळी आपल्या गाई म्हशी सुंदर रित्या सजवून गावातून बँड,फटाके लावत पळवतात.याचे पहाणाऱ्यांना कुतूहल वाटल्याशिवाय रहात नाही. अनेक घरातून यथासांग आरती केली जाते व नंतर म्हशीनां पूढचे गुडघे टेकवून मालक धन्यवाद देत आभार मानायला लावतो.हे .दृश्य पहातांना बघणारेही आचंबित होतात आणि जनावरांना या चागंल्या सवयी शिकवल्याबद्दल कौतूक करण्यास चुकत नाहीत.
तसा हा आजचा पाडव्याचा दिवस म्हशी पळवणाऱ्यां मालकांचा पर्वणीचा असतो.यासाठी गळ्यातील नक्षिदार कांडी,कवड्यांच्या माळा,शिंगातील मोरपिसांचे सुंदर रित्या सजवलेले गुच्चे तसेच पायातील घुंगराचे चाळ,तोंडावर चढवायच्या मोकाडक्यातर एकापेक्षा एक भारी बनवलेल्या असतात.त्या म्हशीच्या शरीरावर रेखाटलेली सुंदर नक्षीतर लक्षवेधीच ठरते.
यामागे सुध्दा एक शास्रिय कारण असेल ते म्हणजे स्वार्थ आणी परमार्थ. गाई,म्हशी,बैलांना मोठ करत गाई,म्हशीकडून दुध,तर बैलांकडून शेतातील काम करुन घेतो हा झाला स्वार्थ.तर गाई म्हशीनां सजवून पाडव्याला मिरवणूक काढतात आणी बैलांना पोळ्यात सजवून मिरवणूक काढून हौसमौज करतात तो झाला परमार्थ.
आर्टिकल: राजू मरवे शेतकरी वडगांव