शनिवारी झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर रविवारी व्यापारी आणि एपीएमसी मधील सेक्रेटरीची बैठक झाली. या बैठकीत मंगळवार दि 27 रोजी पर्यंत कांदा मार्केट मध्ये कांद्याची आवक घेण्यात येणार नसल्याचे ठरविण्यात आले. यामुळे बाहेरून येणाऱ्या कांद्यावर रोख बसणार आहे. यामुळे 21 आणि 24 नोव्हेंबर रोजी कांदा आवक बंद असणार आहे.
सध्या एपीएमसी मध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे हा कांदा खरेदी करण्यास व्यापारी धजत नाहीत. यामुळेच व्यापाऱ्यांनी सेक्रेटरीशी बैठक करुन बाजारात असलेला कांदा संपल्यावरच बाहेरील कांदा उचल करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले आहे.
जो कांदा बाजारात उपलब्ध आहे तो कच्चा आणि कमी दर्जाचा आहे. त्यामुळे बाहेरील व्यापारी कांदा खरेदी करताना विचार करत आहेत. बुधुवारी आणि शनिवार असे दोन आठवडी बाजार दिवशी व्यापार बंद ठेऊन शिल्लक असलेला कांदा विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे 27 नंतर बाहेरील कांदा घेण्यात येणार आहे.
कच्चा कांदा बाजारात आणू नये, अशा सूचनाही शेतकऱ्यांना करण्यात याव्या, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे यापुढे गेट बंद आंदोलन शेतकऱ्यांनी करू नये, असेही सांगण्यात आले आहे. यावेळी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.