बेळगावात पुणे बेंगलोर रस्ता असलेल्या आणि शहर बस स्थानक म्हणून ओळखल्या रस्त्यावर मागील महिन्याभरपासून पथदीप आहेत. त्यामुळे येथुन प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे याची दुरुस्ती कडे मनपा प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मार्केट पोलीस ठाण्या पासून ते सरकारी विश्राम धाम पर्यंत पथदीप सुरूच नाहीत. त्यामुळे रात्रीच्यावेळी मोठी समस्या निर्माण होत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना महिलांना याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे येथे पथदीप बसवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
सध्या सीबीटी बस स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात गैरधंदे होत आहेत. बेकायदा मटका, जुगार, गांजा विक्री असे प्रकार घडत आहेत. मात्र पोलीस अधिकारी कारवाई करण्यात साठी गेले असता अंधाराचा फायदा घेऊन भामटे पळत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर निर्बंध घालणें कठीण झाले आहे.
मुख्य रस्त्यावरीलच पथदीप मागील महिन्याभरापासून बंद असल्याने याची माहिती मनपाला वारंवार देण्यात आली आहे. मात्र आता याची दखल घेतली पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. येथील पथदीप लवकरात लवकर बसून होणाऱ्या गैरप्रकारावर आला घालावा अशी मागणीही करण्यात येत आहे