भारतीय लष्कराच्या सदर्न कमांडमधील अडव्हेंचर टीमने मानाचा आर्मी अडव्हेंचर चॅलेंज कप जिंकला आहे. उत्तराखंड येथील हृषीकेश येथे १२ ते १७ नोव्हेंबर येथे ही स्पर्धा झाली. जिंकलेल्या तुमचा सत्कार समारंभ पुणे येथील कमांडच्या मुख्यालयात झाला.
सदर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी संपूर्ण टीमचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले.कॅप्टन संजय बिश्नोयी व लेफ्टनंट हरिप्रसाद यांनी टीमचे नेतृत्व केले होते.
हवाई दल, नेव्ही आणि लष्कर अशा तिन्ही सैन्यदलातून ११ टीम सहभागी झाल्या होत्या. एकूण ४१ किमी च्या शर्यतीत डोंगर चढ उतार, वॉटर राफ्टिंग, सायकलिंग, नदी ओलांडणे व नेते अनेक प्रकार होते.
दोन वर्षातून एकदा या अशा स्पर्धेचे आयोजन केले जाते. या विजयात मराठा लाईट इंफंट्रीने प्रमुख वाटा उचलला आहे.