मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या एपीएमसी मधील शेतकरी आणि व्यापाऱ्यातील वादावर पडदा पडला आहे. नुकतीच झालेल्या बैठकीमध्ये चांगल्या प्रतीच्या मालाला चांगला दर देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे दराबाबत आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला पूर्ण विराम मिळाला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी एपीएमसी मध्ये कांदा आणि बटाटा रताळी दरासंदर्भात जोरदार आंदोलन केले होते त्यामुळे हे प्रकरण चिघळणार असे दिसून येत होते. मात्र सामंजस्याने हे प्रकरण हाताळण्यात आले असून शेतकऱ्यांनीही याला सहकार्य केले आहे. त्यामुळे या वादावर पडदा पडल्याचे दिसून येत आहे.
सध्या मागील काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारची रताळी पाठविल्याने त्यांना ७०० ते १००० रुपये दर मिळाला. यामुळे यापुढे शेतकऱ्यांनी मुळी वेगळी करून देण्याचे आश्वासन दिले आहे. काही शेतकऱ्यांनी मुळी वेगळी करून आणल्याने त्याला ३०० ते ४०० रुपये दर मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यापुढे चांगल्या प्रतीचा माल पाठवून देऊ असे आश्वासन शेतकऱ्यांनी दिले.
कांद्याबाबत ही असेच शेतकऱ्यांनी ठरविले असून चांगल्या दर्जाचे कांदे उपलब्ध करून देण्याचे यावेळी सांगितले. त्यामुळे चांगल्या मालाला चांगला दर देण्यास व्यापाऱ्यांनीही सहमती दर्शविली आहे. त्यामुळे यापुढे चांगल्या दरासाठी चांगला माल बाजारपेठ मध्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.