शहापूरच्या आळवाण गल्लीत तणावाची अफवा पसरल्याने काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. शहापूर पोलिसांनी परिसरात जाऊन अफवा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
पोलीस गेल्यानंतर दगडफेक झाल्याची अफवा पसरली होती. पण तसे काहीही घडलेले नसून अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या शहर आणि परिसरात बरेचजण अफवांचे पीक पसरवत असून यावर विश्वास न ठेवता शांतता राखण्याची गरज आहे. सध्या संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस करत आहेत.