केंद्र सरकारच्या उडान योजनेत बेळगावचा समावेश झाला असला तरी विमानतळाचे हवाई मार्ग आणि कोणत्या विमानतळात कुठल्या कंपनीची सेवा हे कळण्यासाठी ७ जानेवारी पर्यंत वाट बघावी लागणार आहे.
बेळगावचे खासदार आम्ही उडान मध्ये नाव घालून आणले असे सांगत असले तरी प्रत्यक्षात विमानसेवा मिळालेली नाही. आता पुन्हा फक्त बंगळूर साठीच विमान असून साधे मुंबई व हैद्राबाद या शहरांना सुद्धा विमान देता आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे.
आता जास्त कंपन्या बेळगाव कडे लक्ष केंद्रित करतील असे प्रयत्न करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधी फुकटचे श्रेय घेण्यात गुंतलेले आहेत तेंव्हा पुन्हा सेव्ह आय एक्स जी आणि बेळगाव सिटिझन कौन्सिल सारख्या संघटनांनी पुढाकार घेऊन विमानसेवा मिळवून देण्यासाठी पावले उचलावी लागतील.
बेळगावचे उद्योजक व्यापारी आणि विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे, चेन्नई, हैद्राबाद येथे विमाने गरजेची आहेत. बंगळूर चे विमान फक्त राजकीय व्यक्ती आणि अधिकाऱ्यांची गरज भागवत असून इतरांचाही जरा विचार करा ही मागणी आहे.बेळगावं शहराला उडान मध्ये ऑड रूट मिळू नये याची खबरदारी घेतली पाहिजे.बेळगाव दिल्ली बेळगाव जयपूर विमान सेवा देखील सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत