हिवाळा आला की अनेकांना हुडहुडी भरत असते. या हुडहुडीत आणखी एक हुडहुडी भरवणारी बातमी आली आहे. मागील काही वर्षांपासून वायुप्रदूषणामुळे धोका निर्माण होत आहे. प्रदुषणाचे अनेक स्रोतापैकी वायुप्रदुषण हा अनेकांना मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी ३० लाखाहून अधिक यामुळे मृत्यू झाल्याचे दिसून आले असून आशीया खंडात याचे प्रमाण जास्त आहे.
बेळगावातही याचे प्रमाण दिसुन येत असून अजूनही आरोग्य अधिकारी व विभागाने याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे दिसून येत आहे. बेळगावात वाढती कारखान्यांची संख्या आणि त्यामुळे होणारे प्रदूषण हे मुख्य कारण बनत चालले आहे.
वायुप्रदूषणामुळे अतिसूक्ष्म धूलिकण फुफुसात जातात. अनेक लोक या अतिसूक्ष्म धूलिकणासोबत कार्बन डाय ऑक्साईड आणि सल्फर डाय ऑकसाईड मुळे आजारी पडतात. त्यामुळे मृत्यू होत असल्याचे एका विशेष संशोधनात उघड झाले आहे.
वायुप्रदूषण ही बाब गंभीर असली तरी याचे अजून गंभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे याबाबत आरोग्य विभागाने दखल घेणे गरजेचे आहे.हा आजार बेळगावात हळूहळू आपली पाळेमुळे घट्ट करण्यापूर्वी याबाबत काळजी घेण्याची गरज आहे.