कडोली ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या गुंजनहट्टी नजीक असलेल्या रस्त्यावर गुरुवारी एका मोटार सायकलीची टाटा एस हौदा या टेम्पोला धडक बसल्याने एक तीन वर्षीय मुलगा व वडील जखमी झाले आहेत.
संजय देसार असे त्या युवकाचे नाव आहे. अपघातात त्याचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघात झाल्यानंतर नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
संजय हा काही कामानिमित्त देवगिरीला गेला होता. तो आपले काम आटोपून कडोलीकडे येत असताना गुंजनहट्टी जवळ दुचाकींची टाटा एस ला जोराची धडक बसल्याने संजू व त्याचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती काकती पोलिसांना
देण्यात आली. पंचनामा करून जखमींना खाजगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या रस्त्यावर हा चवथा अपघात असून यापुढे पोलिसांनी येथे एक अधिकारी नेमावा अशी मागणी करण्यात आली.