शेतकऱ्यांचे आंदोलन आणि त्यामुळे बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. मात्र आता देण्यात आलेली मुदत संपली असून कांदा आणि बटाटा, रताळी मालाची आवक घेण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता बाहेरील बटाटा, कांद्याची आवक वाढणार आहे.
शेतकरी व व्यापारी यांच्यातील माल दराबाबत संघर्ष पेटला होता. त्यामुळे चांगला भाव द्यावा अशी मागणी करण्यात आली होती तर व्यापार्यांनी चांगला माल द्यावा आणि दर घ्यावा, असे शेतकऱ्यांना सांगितले होते. त्यामुळे याबाबत एक बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात आला होता.
मागील १५ दिवसापासून बाहेरील माल घेण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे बाजारात केवळ बेळगाव परीसरातील शेतकऱ्यांचाच माल घेण्यात येत होता. आता मात्र दिलेली मुदत संपली असून बटाटा व कांदा आता बाहेरून घेण्यात येत आहे. आता कांदा आणि बटाटा आवक वाढणार आहे.
मागील १५ दिवसात परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपला माल बाजारपेठेत दाखल केला असल्याने आता आंदोलन होणार नसल्याचे दिसून येत आहे. सध्या बाहेरील राज्यातील आवक वाढविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.