बेळगावमध्ये नुकतीच स्थापन करण्यात आलेल्या टायगर ग्रुपच्या कर्नाटक शाखेतर्फे महाराष्ट्र टायगर ग्रुपचे संस्थापक जालिंधरभाऊ जाधव व अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात रुग्णाना तसेच माहेश्वरी अंध शाळेच्या विध्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले आहे.
प्रारंभी चन्नामा चौकातील श्री गणेश मंदिरात पूजा करण्यात आली. त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प हार अर्पण करून शाखेचे उदघाटन करण्यात आले.
टायगर ग्रुपच्या माध्यमातून गोर गरीब जनता व समाजातील होणाऱ्या अन्याया विरोधात कार्य करणार असल्याचे यावेळी कर्नाटक शाखा प्रमुख किरण चौगुले यांनी सांगितले.
यावेळी अमर काकतकर, जयवंत धुळजी, किरण येळ्ळू्कर, निखिल मेलगे, नीरंजन अष्टेकर, विनायक धोकनेकर, विघ्नेश रेड्डी, गोविंद चौगुले, विशाल कांबळे, सूरज कांबळे, नितीन चौगुले, आदित्य जोशी, निलेश बेळगावकर, भावेश जाधव, अभिषेक चौगुले, हरी मांडोळकर, महेश पाटील, प्रसाद खालूकर, कलिंदर होनगेकर, अनिल बामणे, शुभम मंडोळकर, रोहन मंडोळकर, वैजनाथ कदम, महादेव सांबरेकर, आकाश मंडोळकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.