शहराच्या उपनगरातील एकाच पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात दिवसा ढवळ्या तीन घरफोड्या झाल्या असून तब्बल एक कोटीहून अधिक मालमत्ता लंपास झाल्याच्या घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आल्या आहेत.माळ मारुती पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात या घरफोड्या झाल्या असून शहर पोलीस खात्यात मोठी खळबळ माजली आहे.
हिरे, सोन्याचे दागिने आणि घरातील इतर मौल्यवान वस्तू या चोरट्यानी लांबवल्या असून घरात कुणीही नसलेलं पाहून घरफोड्या केल्या आहेत त्यामुळं पोलीस खात हबकून जाग झालं आहे.
पोलिस सूत्रांनी बेळगाव live डॉट कॉम ला दिलेल्या माहितीनुसार श्रीनगर गार्डन जवळील डॉ शांतगेरी यांचं घर फोडून जवळपास एक कोटींचा ऐवज लंपास केला आहे यात हिरे सोन्याचे दागिने आणि घरातील इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.डॉ शांतगेरी हे किल्ला तलाव जवळील डॉ कसबेकर मेटगुड दवाखान्यात सेवा बजावत असतात ते दवाखान्यात होते दुपारी तीन ते सायंकाळी सहाच्या दरम्यान डॉ शांतगिरी यांच्या पत्नी मार्केटला गेल्या त्या मार्केटहुन परत येई पर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरावर चोरट्यानी डल्ला मारत कोटींचा माल लुटला आहे.
शिवतीर्थ कॉलनी येथील जाधव कुटुंबियांच्या घरी घरात कुणी नसलेल पाहून दागिने मौल्यवान वस्तू पळवल्या आहे या घरात अंदाजे पाच लाखांची चोरी झाली आहे. बुधवारी सायंकाळी चार वाजता जाधव कुटुंबातील पती नोकरीला गेले होते तर पत्नी या मुलीला घेऊन उद्यानात फिरायला गेल्या त्या घरी परत येई पर्यंत चोरट्यानी ऐवज लंपास केला आहे. तिसरी चोरी लव्ह डेल स्कुल जवळ चोरी झाली असून तिथेही ऐवज लंपास केला आहे .
माळ मारुती पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून सिंघम इमेज असलेले निरीक्षक बी आर गड्डेकर यांच्या समोर हा तपास एक आव्हान असणार आहे.