ऊस वाहून नेणाऱ्या वाहनांना बेळगाव शहर आणि परिसरातून जाण्यासाठी प्रवेश द्या अशी मागणी काही शेतकऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. आज याबद्दल निवेदन देण्यात आले आहे.सकाळी ८ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते ८ यावेळेत आपण शहरातून जाण्यास अवघड वाहनांवर बंदी घातला आहे.
पण ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर याचा फटका बसत असून नुकसान होत आहे.साखर कारखान्यांना वेळेत ऊस पोचणे गरजेचे असते. यासाठी ही वाहने बेळगाव शहर भागातून जावी लागतात पण बंदी असल्याने नुकसान होत आहे ही परिस्थिती लक्षात आणून देण्यात आली.
आपण ऊस वाहून नेणाऱ्या वाहनांच्या बाबत हा नियम शिथिल करून सहकार्य करा अशी मागणी करण्यात आली आहे.