रविवारी सुवर्ण सौध मध्ये शेतकरी नेत्यांना अटक झाली होती त्यानंतर रविवारी सायंकाळ पासूनच शेतकऱ्यांनी डी सी ऑफिस समोर आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान या शेतकरी आंदोलनात सहभागी असलेली महिला शेतकरी नेता जयश्री गुरणणावर आणि मुख्यमंत्री एच डी कुमार स्वामी यांच्यात वाकयुध्द रंगल आहे.
रविवारी कुमार स्वामी यांनी जयश्री शेतकरी नव्हेत असा आरोप मुख्यमंत्री यांनी केला होता. त्या नंतर कुमारस्वामी यांनी तिच्यावर बोचरी टीका करत चार वर्षे झोपली होती का?असं वक्तव्य केले होते त्याला उत्तर देताना जयश्री हिने तेच प्रत्त्युत्तर देत सी एम जाब विचारला होता व मीडिया समोर वक्तव्य करताना ढसाढसा रडली होती.
जयश्री यांना पाठिंबा देण्यासाठी आज भाजप महिला मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्या विरुद्ध घोषणाबाजी करत निरदर्शन करण्यात आले.मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने समस्त महिलांचा अपमान झाल्याचं भाजप महिला मोर्चाने म्हटलं आहे.