भर वस्तीत असलेल्या घरचं कुलूप तोडून चोरट्यानी तब्बल चार लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना मठ गल्लीत मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे.
मठ गल्ली येथील बसवाणी बँड चे मोहन बागेवाडी यांच्या घरातील 80 ग्रॅम सोन्याचे दागिने एक लाखां रोख रक्कम असा इतर ऐवज लंपास करण्यात आला आहे.मोहन बागेवाडी हे कामा निमित्त परगावी गेले होते ती संधी साधून चोरट्यानी मंगळवारी पहाटे हे कृत्य केलं आहे.
सकाळी घटना उघडकीस येताच मार्केट पोलिसांनी ठसे तज्ञाना घेऊन पहाणी केली.बँडची नवीन वाध्ये आणण्यासाठी कामगारांचे पगार देण्यासाठी त्यांनी वरील रक्कम घरात ठेवली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघे चोरटे युवक सी सी टी व्ही त कैद झाले आहेत मात्र चोरी करताना त्यांनी तोंडावर मास्क आणि नंबर प्लेट नसलेल्या गाडीचा वापर केला आहे.सदर युवकांचे वय अंदाजे 26 असून दोघेही लोखंडी रॉडने कुलूप तोडून घरात प्रवेश केला चोरी केली आहे.
विशेष म्हणजे मोहन बागेवाडी यांच्या घरच्या भिंतीला लागूनच त्यांच्या भावांचे घर असून या घरात झोपलेल्या लोकांना चोरी बद्दल त्यांना काहीच कल्पना आली नव्हती सकाळी दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोरी ध्यानात आली आहे.या प्रकरणी मार्केट पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.