‘बेळगाव ए पी एम सी मार्केट मधील हमाला वर्गाला कमी ओझं हवं आहे कांद्याचा ओझं कमी करा अशी मागणी दोनशेहून अधिक हमालानी ठिय्या आंदोलन केले.
मंगळवारी सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल कर्मचाऱ्यांनी काम बंद केलं होतं.
गेल्या कित्येक दिवसा पासून कांद्याची पोती 50 किलो ऐवजी 70 ते 75 किलो वजनाची येत आहेत त्यामुळे सदर पोती गाडीत भरतेवेळी हमाल वर्गास नाहक त्रास होत आहे 75 किलो ऐवजी पूर्वी प्रमाणे 50 किलो वजनाच पोते असल्यास गाडीत भरतेवेळी किंवा उरते वेळी त्रास होणार नाही त्यामुळं पोत्याचे ओझे कमी करा अशी मागणी हमाल संघटनेनं केली आहे.
या अगोदर अनेकदा ए पी एम सी अधिकाऱ्यांना आणि अध्यक्षाना निवेदन देऊन सुध्दा दुर्लक्ष झाल्याने हमाल संघटनेने मंगळवारी काम बंद आंदोलन करत ठिय्या केलं.शेवटी अध्यक्ष आनंद पाटील अधिकारी श्रीनिवासन यांनी आंदोलन हमाल संघटनेशी चर्चा करत आगामी 1 डिसेंम्बर पर्यंत कांद्याचं पोते 50 किलो कमी करू अस आश्वासन देताच आंदोलन मागे घेतले.