बेळगाव मधील त्या बँकेत नूतनिकरणाच्या नावाखाली झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीची मागणी जोर धरत आहे. या बँकेच्या एक सोहळ्याच्या निमित्त करण्यात आलेले नूतनीकरण सध्या बेळगावच्या आर्थिक क्षेत्रात चर्चेत आले आहे. या कामासाठी प्रत्यक्ष आलेला खर्च व चेअरमन तसेच इतर काही संचालकांनी गळम केलेला फंड याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या बँकेच्या नूतनिकरणासाठी ७० लाखाचा फंड निश्चित करण्यात आला होता नंतर काही कारणांनी तो आणि ७ लाख रुपये वाढवण्यात आला. आपल्याच मर्जीतल्या एक कंत्राटदाराला काम देऊन बेळगावचे नव्हे तर मुंबईचे दर लावण्यात आले आणि प्रत्यक्षात फक्त ३० ते ३५ लाखांचे काम करून बाकीचे पैसे वाटून खाण्यात आले आहेत. अशी चर्चा आहे.
संपूर्ण नूतनीकरण ३० ते ३५ लाखात झालेले असताना बाकीचे पैसे जास्त दर लावून खाणाऱ्या व्यक्तींकडून ते पैसे पुन्हा बँकेच्या खात्यात भरून घेण्याची तयारी काही सदस्यांनी सुरू केली आहे. या भ्रष्टाचारात सहभागी मंडळींचे ?बक्षीस वाटपासाठी असलेल्या ९० लाख राखीव निधीकडेही असेच दुर्लक्ष झाले असून स्वतःचे खिसे भरून घेण्यावर भर दिला आहे. इतर संचालक नाराज झाले आहेत.
नूतनिकरणाच्या कामात बँकेतील सर्व अंतर्गत केबिन्स मोठी करण्यात आली आहेत तर कॅश व इतर कौंटर्स वाढवण्यात आली आहेत. दोन माजी चेअरमन, विध्यमान वादग्रस्थ चेअरमन आणि उपाध्यक्षाने यात पैसे खाल्ल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून या लोकांचा भ्रष्टाचार उघड करावा आणि त्यांच्याकडून खाल्लेली रक्कम वसूल करण्याची मागणी काही जागरूक संचालकांनी केली आहे. या मागणीने गोंधळ उडाला आहे. प्रत्यक्षात दाखवलेला खर्च आणि प्रत्यक्ष झालेले काम याचा फरक त्रयस्थ अभियंत्या कडून तपासून योग्य तपासणी व्हावी अशी मागणी आहे.