संगोळी रायन्ना सोसायटीच्या ठेवीदारांच्या आक्रोश दिवसेंदिवस वाढत चालला आहे. फसवणूक करणारा चेअरमन आनंद अप्पूगोळ याला कारागृहात घाला किंव्हा आम्हाला विष द्या अशी मागणी केली जात आहे.
आज शुक्रवारी पुन्हा ठेवीदार डीसी ऑफिस समोर जमा झाले होते. त्यांनी निवेदन देऊन आम्हाला आमचे पैसे परत मिळवून द्या अशी मागणी केली. तसेच ज्या ज्या लोकांच्या ठेवी दिलेल्या नाहीत त्यांनी संघटीतपणे लढत राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संगोळळी रायना सोसायटीत अनेक गोर गरीब श्रीमंत लोकांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत गेले कित्येक महिन्या पासून हे ठेवीदार आंदोलन करताना दिसत आहेत मात्र त्यांना न्याय मिळेल की नाही त्यांच्या ठेवी परत मिळतील की नाही या बद्दल साशंकता असलो तरी त्या ठेवीदारांचे आंदोलन सुरूच आहे.