बुधवारी लक्ष्मी पूजन असल्याने शहर परिसरात एकच गर्दी झाली होती. याचा फटका शहराच्या रहदारीवर बसला होता. तब्बल एक तासाहून अधिक ट्रॅफिक जाम कपिलेश्वर उड्डाण पुलावर झाली असताना रहदारी पोलीस मात्र गायब होते. यांचा फटका साऱ्यांनाच बसत होता. मात्र शहापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी स्वतः थांबून रहदारी सुरळीत केली. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. जावेद हे काम आटोपून त्या भागातून जात होते.
बुधवारी सायंकाळीआठ च्या सुमारास शनी मंदिर जवळील ओव्हर ब्रिजवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. तब्बल तासभर ही कोंडी झाली असताना रहदारी पोलिसांचा पत्ता नव्हता यामुळे संताप व्यक्त करण्यात येत होता.काही नागरिकांनी 100 क्रमांकावर फोन करून याची परिस्थिती सांगितली. मात्र रहदारी पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करून नागरिकाची हेळसांड करण्यावरच भर देण्यात आला.
इतकी कोंडी झाली असताना देखील कोणात्याच पोलीसाचा पत्ता नव्हता. यामुळे संताप व्यक्त केला जात होता. अनेक नागरिकांना आता आम्ही पुरते अडकलो असे वाटत होते. काहींनी तर रहदारी पोलीस स्थानकात सांगून देखील याकडे दुर्लक्ष केले.
ही कोंडी पाहून निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी स्वतः थांबून ही कोंडी निवारली. वरचेवर सांगूनही रहदारी पोलिसानी दुर्लक्ष केले. मात्र शहापुरचे पोलीस निरीक्षक मुशापुरी यांनी नागरिकांची सोय करण्यासाठी अर्धा तास थांबून ही रहदारीचे कोंडी फोडली आणि नागरिकांची वाहवाह मिळवली. त्यांच्या या कामाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.