एपीएमसी ते कंग्राळी खुर्द रस्त्याची अवस्था ही सरकारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभाराचे उदाहरण आहे आता याला रास्तारोको हेच उत्तर आहे. असा इशारा जि पं संदस्या सरस्वती पाटील यांनी दिला आहे.
आज एपीएमसी पोलीस स्थानकात जाऊन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत सिपीआय कालीमिर्ची यांची भेट घेतली. येत्या काही दिवसात आम्ही कधीही रास्तारोको करून या रस्त्याच्या दुर्दशेबद्दल निषेध व्यक्त करणार आहे. याची माहिती त्यांनी दिली आहे.
जिल्हा पंचायत अभियंते ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत प्रत्येकाला भेटून हा रस्ता करण्याची विनंती आपण केली आहे, पण प्रत्येकजण दुर्लक्ष करत आहे, या रस्त्याने अनेकांना त्रास होत आहे. आता आमचा संयम संपला असून आम्ही रास्तारोको करण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी लेखी निवेदन दिले आहे.