कालपासून सुरू झालेल्या दिवाळी सणाचा आनंद वाढत आहे. आज नरक चतुर्दशीच्या निमित्त बेळगावात पहाटेपासून लगबग सुरू झाली आहे. अभ्यंगस्नान आणि दिवाळी फराळ उरकून नागरिक बाहेर पडत आहेत.
दिवाळीत उटणे, तेल आणि अत्तर लावून केल्या जाणाऱ्या अभ्यंग स्नानाला महत्व आहे. भगवान श्री कृष्णाने याच दिवशी नरकासुराचा वध करून त्याने बंदी बनवलेल्या स्त्रियांची सुटका केली होती. त्यानंतर स्नान घालून कृष्णाचे पूजन झाले होते ही प्रथा सर्वत्र पाळली जाते.
आज खरी गर्दी बाजारपेठेत होणार आहे. दिवाळीच्या निमित्त लोक खरेदी करणार आहेत. दिवाळीत खरेदीलाही तितकेच महत्व आहे. या निमित्त बाजारपेठही फुलून गेलेली आहे.आरती करून घेऊन नागरिक येणार असून त्यांच्या स्वागतासाठी व्यापारीही सज्ज झाले आहेत.
शिव प्रतिष्ठानच्या वतीनं शिवाजी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोर दीपोत्सव तर कंग्राळ गल्लीतील युवकांनी धर्मवीर संभाजी चौकातील संभाजी महाराजांच्या मूर्ती समोर दीपोत्सव करत पहिला दिवा लावला.