मुंबईत वडा पाव या नावाला ला टक्कर देण्यासाठी शिवसेनेने शिववडा हे मराठी नाव लाँच केल होते त्याच धर्तीवर बेळगावातील खवय्यांना मराठी पदार्थांच्या चवीची पर्वणी देण्यासाठी बेळगाव तालुका शिवसेना शिव वडा विक्री सुरू करण्यात येणार आहे.तालुका शिवसेना प्रमुख सचिन गोरले यांच्या संकल्पनेतुन शिव उद्योग समूहाची सुरुवात करण्यात येणार आहे.
बेळगाव खानापूर रोड वर पिरनवाडी येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात शिव वडा मिसळ पाव केंद्राची सुरुवात करणार आहेत.खास दिवाळीच्या निमित्ताने शुक्रवारी 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता उदघाटन करण्यात येणार आहे.बेळगावच्या उपमहापौर मधूश्री पुजारी,जिल्हा पंचायत स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल आणि पिरनवाडी ग्राम पंचायत अध्यक्ष राकेश तलवार यांच्या हस्ते उदघाटन केलं जाणार आहे.
या शिव वडा उद्योग समूहाच्या माध्यमातून खवय्यांना बेळगावात मराठमोळा पद्धतीचा शिव वडा आणि कोल्हापूर पद्धतीचा मिसळ या पदार्थांची चव खायला मिळणार आहे.गरीब कुटुंबाना रोजगार देण्याचा उद्देश्य असून पिरनवाडी येथुन याची सुरुवात होणार आहे.अशी माहिती तालुका शिवसेना प्रमुख सचिन गोरले यांनी बेळगाव live शी बोलताना दिली.या शिव वडा केंद्रा नंतर किणये,जांबोटी आणि बेळगाव शहरात देखील या केंद्रांचा विस्तार करू असेही त्यांनी सांगितलं.
मुंबईत शिवसेनेच्या वतीनं शिव वडा पाव असे नाव दिले होते अनेक मराठी तरुणांना मुंबई महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध करून दिला होता त्याच धर्तीवर सीमा भागातील युवकांना छोटा रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही करू असेही गोरले म्हणाले.