दिवाळीला किल्ला करण्याची पद्धत आहे. अनेक विद्यार्थी व तरुण आपापले घर व गल्लीत किल्ला बनवतात. शिवकालीन इतिहासाची उजळणी या निमित्ताने केली जाते. या मुले व तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शिवभक्ती व प्रेरणा जागृत करण्यासाठीच बेळगाव live घेऊन येत आहे भव्य किल्ला स्पर्धा.
जिल्हा पंचायतचे शिक्षण स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल हे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. त्यांनी या स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक केले. लहान वयातच किल्ला तयार करताना शिवाजी महाराजांनी किती त्रास सहन केले याचा अंदाज मुलांना येतो आणि त्यांच्यात जागृती निर्माण होते. असे त्यांनी सांगितले. मराठी संस्कृती जतन करण्यासाठी किल्ले बनवण्याची परंपरेला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असेही त्यानी नमूद केले.
यामुळेच या स्पर्धेला प्रवेश फी ठेवली नाही आणि सहभाग घेणाऱ्या प्रत्येक समूहाला मिळेल बेळगाव live कडून प्रमाणपत्र. रोख बक्षीशेही दिली जाणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे.
मग लवकर पाठवा आपला ग्रुप फोटो विथ किल्ला आमच्या या 7899816165 व्हाट्सएपच्या क्रमांकावर पाठवा आणि स्पर्धा यशस्वी करा असे आवाहन त्यांनी live च्या माध्यमातून केलंय.