दिवाळी असल्याने खासगी बसनी आपले तिकीट भाडे भरमसाठ वाढवले आहे. या विरोधात आरटीओ खात्याने कारवाई सुरू केली आहे. बेळगाव मध्ये अशा पाच खासगी बसवर कारवाई करण्यात आली आहे.
त्या पाच बस आरटीओ नी जप्त केल्या आहेत. जास्त सामानाची वाहतूक करणे, प्रवाशांकडून जादा तिकीट भाडे घेणे, कर चुकवणे असे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत.अनेक वर्षे असा कारभार सुरू आहे पण यंदा आरटीओ नी कारवाई सुरू केली आहे.
बंगळूर पासून ही कारवाई सुरू आहे.
बेळगाव ते बंगळूर साठी ९०० रुपये तिकीट घेण्यापेक्षा यावेळी १८०० रुपये घेतले जात असून याविरोधात ही कारवाई केली आहे.