एकीकडे बेळगाव एपीएमसी वर काँग्रेसने बाजी मारली असल्याने दुसरीकडे खानापूर एपीएमसी कडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. मात्र माजी आमदार अरविंद पाटील यांच्या पॅनलने खानापूर एपीएमसी वर आपला ताबा कायम ठेवत महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व कायम ठेवले आहे.
खानापूर एपीएमसी अध्यक्षपदी रामचंद्र पाटील यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खानापूर येथे मराठीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीच्या धडपडीला यश मिळाले आहे. यापुढेही खानापुरात मराठीचे वर्चस्व राहील असे सांगण्यात येत आहे.
मागील 15 दिवसापासून खानापूर एपीएमसीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. काँगेस आणि इतर राजकीय पक्षांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र त्यांना यामध्ये यश मिळविता आले नाही. ही बाजी मारण्यासाठी अनेकांनी चांगलेच प्रयत्न केले आहेत. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला होता.