Friday, January 10, 2025

/

‘नारायण गौडाची घसरली जीभ’

 belgaum

लोकशाही मार्गातून आंदोलन करून घटनेने दिलेल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात करवे अध्यक्ष नारायण गौडाने गरळ ओकली आहे. शनिवारी रात्री गौडा बेळगाव शहरातील महंतेशनगर येथे करवेच्या वतीनं कर्नाटक राज्योत्सव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बेळगावात आले होते.

narayan gouda krv

महाराष्ट्र एकीकरण समितीची तुलना त्यांनी दशहतवाद्यांशी केली असून समितीचा दशवादाला आमचा विरोध आहे अश्या खालच्या शब्दात त्यांनी समिती विरोधी गरळ ओकली आहे.

या कार्यक्रमात उत्तर भाजपचे आमदार अनिल बेनके यांनी देखील सहभाग दर्शवला होता.आपल्या कन्नड मतदारांना खुश करण्यासाठी आमदार महोदयांनी कन्नड मध्ये भाषण केले अन कार्यक्रमातुन लवकर निघून गेले मात्र नारायण गौडा यांनी उत्तर आमदरावर देखील सडकून टीका केली.

नारायण गौडा यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बाबतीत अनेकदा जहरी टीका आहे शनिवारी रात्री त्यात आणखी भर पडली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.