आश्चर्य आहे आणि विश्वास न ठेवण्यासारखीच बातमी आहे. पण स्वतः मनपा आयुक्त शशीधर कुरेर यांनी ही बातमी अधिकृत प्रमाणपत्र सहित सोशल मीडियावर टाकली आहे. होय बेळगाव मनपाला भारत सरकारच्या हौसिंग आणि अरबन मिनिस्ट्री तर्फे देण्यात येणारा स्वच्छता पुरस्कार मिळाला आहे.
या शहरात कचरा उघड्यावर टाकला जात नाही असे प्रमाणपत्र मनपाला मिळाले आहे. बेळगाव शहरातील कचरा उघड्यावर टाकला जात नाही त्याची रोजच्या रोज उचल होते आणि कुठेच दुर्गंधी दास, माश्या यांचा त्रास नाही असाच या पुरस्काराचा अर्थ आहे.
क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हे प्रमाणपत्र दिले असून त्यावर स्वच्छ भारत मिशन ने जॉईंट डायरेक्टर विजय कुमार जिंदाल यांची सही आहे.